TOD Marathi

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घेतली आहे. भाजपचे उमेदवार मुरजी पटेल (Murji Patel) यांचा अर्ज आम्ही मागे घेत आहोत, अशी घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. (BJP Maharashtra President Chandrashekhar Bawankule announced) मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, त्याचबरोबर शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांनी ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, अशा प्रकारची मागणी केली होती. काही वेळापूर्वीपर्यंत परिस्थिती अशी होती की ऋतुजा लटके (Rutuja Latke) आणि मुरजी पटेल यांच्यात प्रमुख लढत होईल असच चित्र होतं. मात्र, त्यानंतर मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज भाजप आणि मागे घेणार आहे. त्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक आता जवळपास बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट आहे.

यानंतर ऋतुजा लटके यांची देखील पहिली प्रतिक्रिया आली आहे. (Rutuja Latke first reaction after Murji Patel took application back from Andheri East by election) आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं, आशीर्वाद दिला त्या सर्वांचे आभार ऋतुजा लटके यांनी व्यक्त केले आहेत. ही निवडणूक बिनविरोध होत आहे, माझे पती रमेश लटके यांनी अंधेरी पूर्व क्षेत्रात केलेलं काम आणि लोकांशी त्यांचे असलेले चांगले संबंध याचं हे फळ आहे असं त्या म्हणाल्या. आपल्यासाठी देखील लक्ष्य हे अंधेरी पूर्व विधानसभेचा विकास हेच असेल, असंही त्यांनी म्हटलं. त्यासोबतच त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे देखील आभार व्यक्त केले आणि आपण त्यात थोड्या वेळात त्यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितलं आहे