TOD Marathi

फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग आले अडचणीत; ‘इथली’ जमीन केली खरेदी

टिओडी मराठी, दि. 4 मे 2021 – फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग याने अमेरिकेतील निसर्गसमृद्ध हवाई बेटावर केलेली जमीन खरेदी वादग्रस्त ठरली आहे. या खरेदीमुळे मार्क अडचणीत आले आहेत. मार्कने या बेटांवर या अगोदर ६०० एकर जमीन ३९२ कोटी रुपयांना खरेदी केली होती. त्यानंतर त्याने कुआई आणि पिला द्वीपावर दोन हजार एकर जमीन खरेदी केली आहे, असे समजते.

इतक्या अधिक प्रमाणावर जमीन खरेदीमुळे धास्तावलेल्या स्थानिक नागरिकांनी त्या विरोधात मोहीम सुरु केलीय. सुमारे १५ लाख पेक्षा अधिक नागरिकांनी मार्क विरुद्ध ऑनलाईन याचिका हस्ताक्षर मोहीम सुरु केलीय.

बाहेरच्या कुणाच्या ताब्यात येथील जमीन गेली तर पुन्हा एकदा येथील जनतेला राजेशाही व्यवस्था सोसावी लागेल, अशी त्यांची भीती आहे. त्याचा परिणाम या स्थानिकांच्या आयुष्यावर होणाराय.

१८९५ पर्यंत या बेटांवर राजेशाही होती. त्यानंतर ही बेटे अमेरिकेमध्ये विलीन झाली होती. सुरवातीला येथे एक मिशनरी जोडपे येऊन राहिले होते. तसेच १८३७ मध्ये त्यांनी येथे मोठी जमीन ताब्यात घेतली होती. ही जमीन १९७५ मध्ये वायली कॉर्पोरेशनने खरेदी केली असून आता ही जमीन बाहेरच्या लोकांना विकली जातेय. मार्कने खरेदी केलेली जमीन या पैकी आहे. बाहेरच्या लोकांचा हस्तक्षेप वाढल्यामुळे हवाईच्या संस्कृतीला धोका निर्माण होत आहे, असा आरोप केला जात आहे.