फेसबुक वरील फॉलोवर्सची संख्या अचानक घटल्याचे अनेकांना लक्षात आले. मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग (CEO Mark Zukerberg) देखील यातून सुटलेला नाही, फेसबुक मधील बगमुळे लाखो लोकांचे फॉलोवर्स एका रात्रीत गायब झाले आहेत. आता मार्क झुकरबर्गचेही केवळ 9996 एवढे फॉलोवर्स उरले आहेत. ज्याची संख्या त्याच्या पेजवर देखील आपल्याला पाहता येईल. इतर अनेक युजर्सनी देखील अचानक फॉलोवर्सची संख्या कमी झाल्याबद्दल तक्रार केली आहे. बनावट फॉलोवर्सच्या छाटणीचा हा परिणाम असल्याचेही म्हटले जात आहे. मात्र जर असं असेल तर मार्क झुकरबर्गचेही सर्व फॉलोवर्स बनावट होते का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान यानंतर अनेक नेटकऱ्यांनी फेसबुकला ट्रोल देखील केलं आहे. काहींनी मिम्स शेअर करत या प्रकाराची खिल्लीही उडवली आहे.
ये नौ हज़ार का अशुभ अंक किस अंक ज्योतिषी ने बता दिया है जुक्कू को मने एकदम ही समतामूलक समाज की संरचना कर दी है रातों-रात सबको 9000 के अंदर ला पटका 🙄@facebook right now- pic.twitter.com/zpViQpmcv3
— Nazia Khan (@NaeemDrnazia) October 12, 2022
गेल्या काही दिवसात फेसबुकवर फॉलोवर्सची संख्या झपाट्याने घटत आहे. अशी तक्रार अनेक फेसबुक युजर्सनी केली होती. (Facebook users complains about decreasing number of followers) त्यानंतर स्वतः मार्क झुकरबर्गचे फॉलोवर्स कमी झाल्या नंतर मात्र आणखीन मोठ प्रश्नचिन्ह उभा राहिलं. अनेक लोकांनी याबाबतची तक्रार त्यांच्या फेसबुक वॉलवर केली होती. सुरुवातीला प्रत्येकाला कदाचित असं वाटलं असेल की हे आपल्या बाबतीतच होतंय. मात्र, त्यानंतर फेसबुकवर अनेक लोकांनी विचारणा केली होती. तेव्हा मोठ्या प्रमाणात लोकांचे फॉलोवर्स कमी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे, ही तांत्रिक अडचण आहे की फेसबुकच्या धोरणांमध्ये काही बदल झाला आहे? याबाबत फेसबुकच्या वतीने अधिकृतरित्या काही कळवण्यात आलेल्या नाही आहे. मात्र, अचानक फॉलोवर्सची संख्या घटल्याने अनेकांना धक्का बसला आहे.