TOD Marathi

Facebook सह Instagram वर खेळता येणार ‘Like’ चा लपंडाव; वापरकर्त्यांना दिला मुक्त वाव

टिओडी मराठी, दि. 30 मे 2021 – सध्या अनेकजण सोशल मीडियाचा वापर अधिक प्रमाणात करतात. यात फेसबुक आणि इन्स्टाग्राम आघाडीवर आहे. फेसबुकसह इन्स्टाग्रामवर आता ‘लाइक’ चा लपंडाव वापरकर्त्यांना खेळता येणार आहे. हे कसं ते जाणून घेऊया.

फेसबुकच्या वॉलवर पोस्ट लिहिली की त्याला किती ‘लाइक्स’ मिळतात?, हे पाहण्याकडे वापरकर्त्यांचा कल अधिक असतो. तसाच तो इन्स्टाग्रामवरही असल्याचे दिसून येतो. आपण या ठिकाणी पोस्ट केलेल्या छायाचित्रांना आपल्या परिचयातील लोकांनी ‘लाइक’ केले का?, किती लोकांनी केले? याची उत्सुकता पोस्टकर्त्याला असते.

किती ‘लाइक्स’ येतात त्यावरून संबंधित पोस्टकर्त्याचे ‘स्टेटस’ ठरते. मात्र, आता या दोन्ही मंचांवर वापरकर्त्यांना येणारे लाइक्स आणि त्यांची संख्या हे इतरांपासून आता लपवून ठेवता येणार आहे. हा लपंडाव फेसबुकसह इन्स्टाग्रामवर वापरकर्त्यांना खेळता येणार आहे. हा ‘लाइक’ चा डाव खेळण्यास वापरकर्त्यांना दिला आहे.

इन्स्टाग्रामने त्यासाठी ‘टर्न ऑफ लाइक’ हे टूल आपल्या वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करून दिलंय. ज्या वापरकर्त्यांना आपल्या पोस्टवर येणाऱ्या लाइक्सची संख्या सार्वजनिक करायची नसेल ते वापरकर्ते हे टूलचा वापर करू शकतात.

इन्स्टाग्रामने अलीकडे याबाबत एक चाचणी घेऊन पाहिली. त्यात आपल्या पोस्टवर किंवा विचारांवर कोणी प्रतिक्रिया देण्याचा धोका कमी आहे, असे लक्षात आल्यावर अनेकांनी पोस्ट लिहिल्याचा अनुभव आला, असे इन्स्टाग्रामचे मुख्याधिकारी ॲडम मोसेरी यांनी सांगितले आहे.

लाइक्सची संख्या दडवून ठेवण्याचा पर्याय उपलब्ध असेल तर वापरकर्ते त्याचा खुलेपणाने स्वीकार करू शकतात, असे या चाचणीतून निष्पन्न झाले. फेसबुकनेही लाइक काऊंट्स बंद करण्याचा पर्याय काही निवडक लोकांना देऊ करत यासंदर्भात एक सर्वेक्षण केले. त्यात काही लोकांना ते पसंत पडले नाही, असे आढळले.परंतु लाइक्सची संख्या लपवून ठेवण्याच्या स्वातंत्र्याचा अनेकांनी पुरस्कार केला, असे फेसबुकच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले.

तज्ज्ञांचे मते, लाइक्स मिळविण्याचा अट्टहास हा अलीकडे एक मानसिक आजार म्हणून पाहिला जाऊ लागलाय. आपल्या पोस्टला अधिक प्रमाणात लाइक्स न मिळाल्यास अनेकांना वैफल्य आले आहे, असे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना फेसबुकसह इन्स्टाग्रामवर ‘लाइक’ चा लपंडाव खेळता येणार आहे.