TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 6 जुलै 2021 – जम्मू-कश्मीरला राज्याचा दर्जा प्रदान केल्यानंतर विधानसभेच्या निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी कश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांच्या पीपल्स अलायन्स फॉर गुपकार डिक्लेरेशन (पीएजीडी) या आघाडीने केलीय.

राजकीय पैद्यांची मुक्तता करण्याबरोबर कश्मीरमध्ये विश्वासपूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी उपाययोजना केल्या जातील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते. मात्र, त्यावर काहीच कार्यवाही न झाल्याने गुपकार नेत्यांनी नाराजीही व्यक्त केलीय.

रविवारी गुपकार नेत्यांनी एक बैठक झाली. त्यात पीपल्स डेमोव्रेटिक पार्टीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती, मुख्य प्रवक्ते एम. वाय. तारिगामी आणि नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांच्यासह आघाडीतील सर्व नेते सहभागी झाले होते. 24 जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीबाबत चर्चा झाली होती.

जम्मू-कश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा दिला जाईल, अशी घोषणा भाजपने संसदेत केली होती. त्यामुळे भाजपने त्याचे पालन करावे, अशी मागणी गुपकार नेत्यांनी केली आहे. जम्मू-कश्मीरला राज्याचा दर्जा मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय.