TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 22 मे 2021 – याअगोदर करोनावर प्रभावी ठरेल असं 2-डीजी (2-DG) हे औषध बनवणाऱ्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात DRDO ने आता किट बनवलं असून याद्वारे तुमच्या शरीरामधील करोनाशी लढण्यासाठी आवश्यक असलेल्या अँटीबॉडीज किंवा प्लाझ्मा आहे का? हे समजू शकणार आहे. या किटचे नामकरण DIPCOVAN असे केलं आहे. या किटच्या चाचण्या १ हजार रुग्णांवर करणार आहेत.

DRDO च्या या किटला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) एप्रिल महिन्यात परवानगी दिलीय. तर DIPCOVAN किटला ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने मी महिन्यात परवानगी दिलीय. हे किट जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बाजारात येणार आहे. याची किंमत केवळ ७५ रुपये असणार आहे, असे सांगितले आहे.

DIPCOVAN द्वारे शरीरातील स्पाईक प्रोटीनची चाचणी हि करता येईल. या किटची संवेदनशीलता ९७ टक्के इतकी असून ते ९९ टक्क्यांपर्यंत अचूक आहे. करोनाविरोधातील लढ्यात हे किट अत्यंत महत्वपूर्ण आहे, असे मानतात.

लसीकरणावेळीही या किटचा उपयोग करून योग्य निर्णय घेण्यास मदत होणार आहे. तत्पूर्वी, DRDO ने २-डीजी हे औषध सादर केल्यामुळे करोना रुग्णांना लागणाऱ्या ऑक्सिजनची गरज कमी करण्यात मदत होणार आहे, असा दावा केला होता.