TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 22 मे 2021 – रामदेव बाबा यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात आयएमए (IMA) ने आक्रमक पवित्रा घेतला आहे. एका व्हायरल व्हिडिओचा संदर्भ देत आयएमएने रामदेव बाब यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी केली आहे. यासाठी त्यांनी एक पत्रक जारी केलंय. त्यामुळे देशात रामदेव बाबा विरुद्ध आयएमए असं चित्र पाहायला मिळत आहे.

एकतर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी रामदेव बाबा यांनी केलेले आरोप मान्य करावे. व आधुनिक उपचार पद्धती रद्द करावी. अन्यथा, त्यांच्यावर कारवाई करत त्यांच्याविरोधात साथ नियंत्रक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी पत्रकामध्ये केली आहे.

लोकांचे जीव वाचवण्यासाठी आधुनिक उपचार पद्धतीने उपचार सुरु आहेत. भारत सरकार देखील करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे. या लढाईत आतापर्यंत १२०० अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे, असे असताना रामदेव बाबा आपल्या व्हिडिओत अ‍ॅलोपॅथी एक मूर्ख आणि बिनकामाचे विज्ञान आहे, असे आहेत, याकडेही केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं आहे.

रामदेव बाब यांनी करोनाच्या मृत्यूमागे अ‍ॅलोपॅथी कारण आहे, असे व्यक्तव्य सार्वजनिकरित्या सांगितलंय. करोना रुग्णांवर अ‍ॅलोपॅथी औषधांचा मारा केल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केलाय. त्यांच्या या विधानामुळे करोना काळात रुग्णांची सेवा करण्याऱ्या डॉक्टरांनी आक्रमक पवित्रा घेतलाय.

यापूर्वी देखील पतंजलीच्या करोना औषधावरुन वाद झाला होता. मागील वर्षी जून महिन्यामध्ये ‘कोरोनिल’ हे औषध जारी केलं होतं. मात्र, या ‘कोरोनील’वर बंदी घातली आहे. त्यामुळे रामदेव बाबा असं व्यक्तव्य करत नाहीत ना? असा प्रश्न निर्माण होत आहे.