TOD Marathi

महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक पार पडली, (Rajyasabha Election 2022) दीर्घकाळ रखडलेल्या मतमोजणी प्रक्रियेनंतर मतमोजणी झाली. त्यानंतर निकाल जाहीर करण्यात आलाय. यात भाजपने तीन जागांवर विजय मिळवला. यामध्ये शिवसेनेचा एक, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा प्रत्येकी एका उमेदवाराने विजय मिळवलाय. भाजपाकडून धनंजय महाडिक, अनिल बोंडे, पीयूष गोयल हे रिंगणात उतरले होते तर शिवसेनेकडून संजय पवार आणि संजय राऊत, काँग्रेसक़डून इम्रान प्रतापगढी, राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल उमेदवार होते. (Praful Patel, Imran Pratapgadhi, Sanjay Saut, Sanjay Pawar, Anil Bonde, Piyush Goyal, Dhananjay Mahadik)

महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि भाजप (BJP) दोन्ही बाजूनी आमचे सर्व उमेदवार निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला जात होता मात्र खरी लढाई ही सहाव्या जागेसाठी म्हणजेच भाजपचे धनंजय महाडिक विरुद्ध शिवसेनेचे संजय पवार (Sanjay Pawar Shivsena) यांच्यामध्ये होती.

या अत्यंत चुरशीच्या आणि अटीतटीच्या ठरलेल्या लढाईत भाजपचे धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik BJP) यांनी विजय संपादन केला. धनंजय महाडिक यांचा विजय महाविकासआघाडी साठी मोठा धक्का आहे अशी चर्चा राजकीय वर्तूवेळात आहे.