TOD Marathi

पुणे:
नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीत (Rajyasabha Election) भाजपच्या गटातील एक मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांना मिळाल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला. (NCP got one MLA vote from BJP Quota, says Sharad Pawar) प्रफुल पटेल यांना सुरक्षित करायच्या नादात राष्ट्रवादीने त्यांच्यासाठी जास्त मतांचा कोटा राखून ठेवला. ही मतं शिवसेनेच्या संजय पवार यांना देता आली नसती का, असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. त्यावेळी शरद पवार यांनी हा खुलासा केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल पटेल यांना मिळालेल्या अतिरिक्त मतांपैकी एक मत हे शिवसेनेला ट्रान्स्फर होऊच शकलं नसतं. कारण, विरोधकांच्या गटातील एका आमदाराने मला सांगून प्रफुल पटेल यांना मत दिले होते. मी राष्ट्रवादीला मत देणार असल्याचेही त्यांनी मला सांगितले होते. भाजपच्या गटात असे अनेक लोक आहेत की, ज्यांच्यासोबत मी कधीकाळी काम केले आहे. मी एखादा शब्द टाकला तर नाही बोलायची त्यांची तयारी नसते. पण मी या सगळ्यात पडलो नाही. तरीही विरोधी गटातील एका आमदाराने स्वत:हून राष्ट्रवादीला मतदान केले. हा आमदार भाजपचा नसून अपक्ष आहे. पण तो भाजपच्या गटातील आहे, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. शनिवारी सकाळी पुण्यात त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. (Press Conference Pune)

राज्यसभा निवडणुकीच्या निकालामुळे महाविकास आघाडी सरकार अस्थिर होईल, हा दावा शरद पवार यांनी फेटाळून लावला. महाविकास आघाडीचे एकही मत फुटलेले नाही. त्यामुळे सरकार चालवण्यात कुठलाही धोक नाही असेही ते म्हणाले.