TOD Marathi

मुंबई :

राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान झाले. (Rajyasabha Election) मात्र मतमोजणीला विलंब होत आहे. कारण भाजपने मुख्य निवडणूक आयुक्तांकडे यशोमती ठाकूर, जितेंद्र आव्हाड आणि सुहास कांदे (Yashomati Thakur, Jitendra Awhad, Suhas Kande) यांनी मतपत्रिका दुसर्‍यांना दाखवल्याचा आक्षेप घेत त्यांचे मत रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे मत मोजणीला विलंब होत आहे. जवळपास सात तासांहून जास्त कालावधी लोटलेला आहे मात्र मतमोजणीला अजूनही सुरुवात झालेली नाही. काही वेळापूर्वी निवडणूक आयोगाने एक महत्त्वाची बैठक घेतली. (Election Commission)

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी भाजपच्या आक्षेपाला उत्तर दिले आहे. मी काहीही चुकीचे केलेले नाही. मी नियमाप्रमाणे मतदान केला आहे असा दावा त्यांनी केला. मतमोजणी विनाकारण लांबवली जात असल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. मात्र मतमोजणीला अद्याप सुरुवात झाली नाही आहे. अर्ध्या तासाने मतमोजणी सुरु होई अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.