“मेरी हिम्मत को परखनेकी गुस्ताखी मत करना…”

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचा बैठक पनवेल येथे झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीकास्त्र सोडले. खऱ्या अर्थाने आता राज्यात हिंदुत्ववादी सरकार आलेलं आहे, लोकांचं सरकार आलं आहे. असं वक्तव्य केलं. माझ्या पक्षाने जरी मला उपमुख्यमंत्री केलं असेल तरी त्या मागची भावना ही मोठी आहे आणि त्यामुळे मी कृतकृत्य झालो अशाही भावना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्यावरही देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली तर चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी विविध मुद्द्यांवर महाविकास आघाडीला फटकारले.

देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे:

◆ केंद्राने निधी देऊन सुरू केलेले प्रकल्प महाविकास आघाडीने बंद केले.

◆ महाविकास आघाडीने विकासाच्या योजनांवर स्थगिती आणली.

◆ मविआकडून अडीच वर्षात सूड उगवण्याचं काम झालं.

◆ बदला आणि भ्रष्टाचारासाठी सरकार चालवत होते.

◆ अडीच वर्षात राज्यात अघोषित आणीबाणी होती.

◆ सरकार विरोधात बोललं की घर तोडलं जायचं, जेलमध्ये टाकलं जायचं.

◆ महाराष्ट्रात सत्तेचा गड जिंकण्यात आपल्याला यश आलं.

◆ सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजित नही

◆ महाराष्ट्रात परिवर्तन झालं पाहिजे, ही जनतेची इच्छा होती.

◆ एकनाथ शिंदे अचानक नव्हे तर ठरवून मुख्यमंत्री झालेत.

◆ पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून विकासाची यात्रा सुरू आहे.

◆ महाराष्ट्रात रयतेचं राज्य आलं आहे.

◆ पहिल्यांदाच महाराष्ट्रात 50 आमदार सरकार सोडून विरोधात आले.

◆ पुढच्या निवडणुकीत आपण दिसणार नाही हे आमदारांनाही कळालं.

◆ ज्यांच्या विरोधात लढले त्यांच्या अधिपत्याखाली आमदारांना राहावं लागलं.

◆ दाऊदशी संबंध असलेल्या मंत्र्यांविरोधातही बोलता येत नव्हतं.

◆ शिवसेनेचा विचार जिवंत ठेवण्याचं काम एकनाथ शिंदे यांनी केलं.

◆ शिवसेनेने आमच्याशी बेईमाने केली होती.

◆ मी उद्धव ठाकरे यांना फोन करत होतो मात्र, ते फोन घेत नव्हते कारण त्यांचं ठरलं होतं.

◆ उद्धव ठाकरेंचे सरकार सोयीचं सरकार होतं.

◆ एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही खरोखर शिवसेना.

◆ लढाई लढाईची असते तेव्हा सेनापतीच्या मागे भक्कमपणे सरदार लागतात.

◆ उद्धव ठाकरे स्वतः सेनापती झाले मात्र त्यांचे सरदार मागून निघून गेले.

◆ आमच्या सरकारने कमी कालावधीत अनेक चांगले निर्णय घेतले.

◆ मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे आपल्या सर्वांचे नेते आहेत.

◆ पक्षाच्या वतीने माझा सन्मानच झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे आभार.

◆ सरकार अडीच वर्षे पूर्ण करेल आणि पुन्हा निवडून येईल.

◆ हे खरं हिंदुत्ववादी सरकार आहे.

◆ चोरून गेलेला महाराष्ट्र आम्ही परत आणला.

◆ तुमच्यावर अन्याय म्हणजे मुंबई आणि महाराष्ट्रावर अन्याय नाही.

◆ तुमच्या विरोधात काही केलं की तो महाराष्ट्रदोह कसा?

◆ सकाळी 9 ला बोलणारे आता कमी बोलायला लागले.

◆ हा लाऊड स्पीकर बंद करण्यासाठी सत्ता परिवर्तन हाच पर्याय होता.

◆ तुम्ही त्यांना शिव्या देऊ नका तर आभार माना.

◆ राऊतांचे आभार मानले पाहिजे, आपलं सरकार येण्यात त्यांचाही वाटा.

◆ मागच्या सरकारमध्ये विमा कंपन्यांचा फायदा झाला मात्र शेतकऱ्यांचा नाही.

◆ मध्यप्रदेशातील महिन्यात ओबीसी आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण.

◆ आपलं युतीचं सरकार, त्याग कोणाला तरी करावा लागेल. तडजोड करावी लागेल.

◆ विचार सोडून सत्तेच्या मागे लागू तर भाजपचाही ऱ्हास होईल.

असे अनेक मुद्दे मांडत देवेंद्र फडणवीस यांनी चौफेर फटकेबाजी केली. देवेंद्र फडणवीस यांचं हे भाषण मात्र भाजपच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारं ठरलं असेल.

Please follow and like us: