TOD Marathi

बाबासाहेब पुरंदरे यांची भाषणं, त्यांचे लिखाण… माझ्या मते शिवछत्रपतींवर इतका अन्याय दुसरा कोणी केलेला नाही, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी व्यक्त केलं. डॉ. श्रीमंत कोकाटे लिखित (Dr. Shrimant Kokate) ‘शिवचरित्र आणि विचार प्रवाह’ ग्रंथाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. शरद पवार यांच्यासह या कार्यक्रमास छत्रपती शाहू महाराज, माजी न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील हे देखील उपस्थित होते. (Chhatrapati Shahu Maharaj, B J Kolse Patil) जे काही लिखाण त्यांनी केलं, जी काही मांडणी केली त्या मांडणीला सत्यावर विश्वास आहे तो घटक कधीही मान्य करणार नाही. त्या व्यक्तींचा महत्त्व वाढवण्यासाठी काळजी त्या ठिकाणी घेतली गेलेली आहे. रामदासांचे योगदान काय? दादोजी कोंडदेवांचे योगदान काय? या सगळ्या खोलात मी जाऊ इच्छित नाही. पण एक गोष्ट चांगली झाली की महाराष्ट्र शासनाने एका काळात उत्तम खेळाडूंना दादोजी कोंडदेव पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला. त्यावर वाद-विवाद झाले आणि 2008 ला राज्य सरकारने दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे मार्गदर्शक, गुरु होते की नाही याचा सखोल अभ्यास करण्याचे काम एका समितीवर सोपवले. आणि त्या समितीने सखोल अभ्यासाअंती हा निष्कर्ष काढला की दादोजी कोंडदेव व शिवछत्रपतींचा काहीही संबंध नव्हता. शिवाजी महाराजांना जर कोणी दिशा दिली आहे तर ती राजमाता जिजाऊंनी दिली आहे आणि यानंतर दादोजी कोंडदेव हा पुरस्कार काढण्यात आला. (Sharad Pawar comments over Babasaheb Purandare, Dadoji Kondadev)

यावेळी बोलत असताना शरद पवार यांनी पुढे म्हटलं की, “अशा अनेक गोष्टी आहेत ज्याच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही. त्या सत्य जरी असल्या तरी त्या अनेकांना न पटण्यासारखे आहेत पण श्रीमंत कोकाटे यांनी हे काम अतिशय चांगल्या पद्धतीने केले आहे. सर्व गोष्टींचे वास्तववादी चित्र त्यांनी दर्शवले आहे. शिवछत्रपतींचा उल्लेख करताना काही जणांनी धर्मांध चित्र रंगवण्याचा तर काहिंनी संकुचित चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण श्रीमंत कोकाटे यांनी सत्य मांडले आहे. आणि अशाच प्रकारचं काम कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी देखील केलं आहे, असेही शरद पवार म्हणाले.

“आपल्याला सत्यावर आधारित नव्या पिढीला प्रेरणा देणारा वास्तव इतिहास पाहिजे,”असेही शरद पवार यावेळी म्हणाले.