दिल्ली कॅपिटल्सची दिमाखदार खेळी; सनरायझर्स हैदराबादला ८ गडी आणि १३ चेंडू राखून केले पराभूत!

IPL 2021- TOD Marathi

दुबई: दिल्ली कॅपिटल्सने दिमाखदार खेळ दाखवत सनरायझर्स हैदराबादला ८ गडी आणि १३ चेंडू राखून पराभूत केले. दिल्लीच्या विजयात नॉर्तजेनं मोलाची भूमिका बजावली. त्याला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आले. त्याच्याशिवाय दिल्लीकडून श्रेयस अय्यरने ४१ चेंडूत ४७ धावांची नाबाद खेळी केली. दुसरीकडे कर्णधार पंत ३१ चेंडूत ३५ धावांवर नाबाद राहिला.

सलामीवीर शिखर धवनने ४२ धावांची खेळी करत संघाच्या विजयाचा पाया रचला. याशिवाय त्याने खास विक्रम आपल्या नावे नोंदवला. धवनने सलग सहाव्यांदा एका हंगामात ४०० पेक्षा अधिक धावांचा पल्ला पार करुन दाखवला आहे.

यंदाच्या हंगामात धवनने ९ सामन्यात ४२२ धावा केल्या आहेत. २०१६, २०१७, २०१८, २०१९ आणि २०२० च्या हंगामातही त्याने ४०० + धावा केल्या होत्या. आयपीएल स्पेशलिस्ट सुरेश रैना आणि डेविड वॉर्नर यांनी सलगत ७ वेळा एका हंगामात ४०० पेक्षा अधिक धावा करण्याचा पराक्रम करुन दाखवला आहे.

Please follow and like us: