TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 17 जून 2021 – देशातील कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या आकडेवारीची गती कमी झाली आहे. बाधितांची आकडेवारी सलग दहाव्या दिवशी एक लाखांहून कमी आलीय. मागील 24 तासांत भारतात 67,208 नव्या कोरोनाग्रस्तांची भर पडली आहे, तर सुमारे 2, 330 रुग्णांचा मृत्यू झालाय.

काल दिवसभरात 1 लाख 3 हजार 570 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. त्याअगोदर मंगळवारी भारतात 62 हजार 224 नव्या रुग्णांची नोंद केली होती, तर 2 हजार 542 रुग्णांचा मृत्यू झाला होता. भारतातील कोरोना रुग्णांचा मृत्यू दर हा 1.28 टक्के इतका आहे तर, रिकव्हरी दर हा 96 टक्के आहे.

महाराष्ट्र राज्यात काल दिवसभरात 10 हजार 107 नवीन कोरोनाग्रस्तांची नोंद झालीय. तर 10 हजार 567 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे. बुधवारी 237 कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मृत्यूची नोंद झालीय.

राज्यात सध्या एकूण 1,36,661 ॲक्टिव्ह रुग्ण असून सरकारी आकडेवारीनुसार राज्यातील 21 जिल्हे आणि मनपा क्षेत्रात एकाही मृत्यूची नोंद केलेली नाही, तर 12 ठिकाणी केवळ एका मृत्यूची नोंद केली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.94 टक्के इतका आहे.