TOD Marathi

कधीकाळी मुंबईतील कामगार, मराठी बहुल भागाने आणि मुंबईसह उभ्या महाराष्ट्राने शिवसेना आणि कम्युनिस्ट पक्षातील संघर्ष पाहिला. मात्र आज एक वेगळ चित्र पाहायला मिळालं. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाने आज शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी पाठिंबा दिला. भाकप नेत्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली (CPI Leaders met Uddhav Thackeray and supporting in Andheri bye election) आणि राज्याच्या राजकारणातील एक वर्तुळ पूर्ण झाल्याचे म्हटले जात आहे.

राज्यात मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी सुरू आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर पहिली निवडणूक ही अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाला भारतीय कम्युनिस्ट पक्षाने पाठिंबा दिला आहे. (Andheri bye election is the first election after Shivsena crisis) बुधवारी दुपारच्या सुमारास भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाने मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन भाजपविरोधातील निवडणुकीला पाठिंबा दर्शवला. भाकपच्या शिष्टमंडळात ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते प्रकाश रेड्डी, मुंबई सचिव मिलिंद रानडे, प्रकाश नार्वेकर, विजय दळवी, बबली रावत यांचा समावेश होता.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने राज्यात नवीन समीकरण होणार का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजपविरोधात घेतलेल्या भूमिकेचे विरोधकांकडून स्वागत करण्यात येत आहे. त्याशिवाय, हिंदुत्वाची नव्याने मांडणी ठाकरे यांच्याकडून सुरू आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात विरोधक एकवटणार का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

कम्युनिस्ट पक्षाचे लालबागमधील आमदार कॉम्रेड कृष्णा देसाई (MLA Krishna Desai murdered) यांची हत्या शिवसैनिकांनी केली असल्याचा आरोप केला जातो. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीतही शिवसेनेचे उमेदवार वामनराव महाडिक हे विजयी झाले होते. देसाई यांच्या हत्येनंतर लालबाग-परळसह मुंबईतील डाव्यांच्या राजकीय प्रभावाच्या अस्ताला सुरुवात झाली असल्याचे म्हटले जाते. डाव्यांचा गिरणी आणि इतर कामगारांवरील प्रभाव कमी करण्यासाठी तत्कालीन काँग्रेस सरकार आणि नेतृत्वाने शिवसेनेला पाठबळ दिल्याचा आरोप करण्यात येतो. त्यातून शिवसेनेवर ‘वसंत सेना’ या शब्दातही टीका करण्यात आली होती.