TOD Marathi

भिवंडीतील २७ भाविकांना भीमाशंकरला घेऊन जाणाऱ्या बसला घोडेगाव-भीमाशंकर रस्त्यावर शिंदेवाडी जवळ बसने अचानक पेट घेतला. बसमधील प्रवासी आणि चालकाच्या तत्परतेने जीवितहानी टळली. परंतु आगीत प्रवाशाचे साहित्य, तसेच बस भस्मसात झाली .

भिवंडीतील भाविकांना दर्शनासाठी घेऊन निघालेल्या भाविकांचच्या बसला बुधवारी सकाळी अचानक आग लागली. घोडेगाव-भीमाशंकर रस्त्यावरील शिंदेवाडी परिसरात हि घटना घडली. बस मधील प्रवाशी आणि चालक वेळेत बाहेर पडल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही. परंतु बस पूर्ण आगीत राख झाली. ठाणे जिल्ह्यमधील भिवंडी परिसरातील पाया गावातील २७ भाविक दर्शनासाठी भीमाशंकर येथे निघाले होते. बुधवारी १२ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास बस ने अचानक पेट घेतला. बसचालक बाबू बसप्पा सुरपूर यांनी तत्परतेने प्रवाशांना बुसमधून खाली उतरवले. काही कळायच्या आत आग भडकली आणि बस पूर्णपणे जळाली.

बस जाळ्याची माहिती बसमधील प्रवाशांनी ग्रामीण पोलीस नियंत्रण कक्षाला दिली . त्यानंतर पोलीस निरीक्षक जीवन माने, यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली . कोणतीही जीवितहानी घडली नाही याची पाहणी केली. बसला आग नेमकी काही लागली ,यामागचे निश्चित कारण समजूशकले नाही. या प्रकरणी घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक परिसरात बसला आग लागल्याची घटना ताजी असतानाच घोडेगाव परिसरात भिवंडीतील भाविकांच्या बसने अचानक पेट घेतला .