TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 4 मे 2021 – करोनापासून बचावासाठी दिली जाणाऱ्या लस खूप आहेत. मात्र, त्या लस किती टक्के आणि किती प्रमाणात आपणाला सुरक्षितता देणार ? हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, कोवॅक्सिन लस 28 दिवस सुरक्षित राहणार आहे, असे आता समोर आलं आहे. मात्र, या काळात लस 2 ते 8 डिग्री तापमानात ठेवावी लागणार आहे.

हैद्राबादच्या भारत बायोटेकची कोवॅक्सिन लसबाबत सांगितलं आहे कि, कोवॅक्सिन लस आता खराब होण्याची शक्यता कमी झाली आहे. ही लस 28 दिवसांपर्यंत सुरक्षित राहणार आहे.

भारत बायोटेकने लसीच्या साठवणूक प्रक्रियेत काही महत्वाचे बदल केले आहेत. त्यामुळे हे शक्य झालं असून २८ दिवसापर्यंत ही लस वापरता येणार आहे. याअगोदर लसची बाटली फोडल्यावर चार तासांच्या आत संपली नाही तर लस वाया जात होती. आता नव्या बदलामुळे लसची बाटली फोडल्यावर देखील ती लस २८ दिवस वापरता येणार आहे. मात्र, या काळात लस २ ते ८ डिग्री तापमानात ठेवावी लागणार आहे.

यामुळे लसचे डोस वाया जाणार नाहीत. सध्या कोवीशिल्ड व कोवॅक्सिन अशा दोन प्रकारच्या कोविड लस देशात दिल्या जात आहेत. कोवॅक्सिनच्या एका बाटलीत २० डोस आहेत तर कोविशिल्डच्या एका बाटलीत १० डोस आहेत. आयसीएमआर व पुण्याच्या एनआयव्ही मधील वैज्ञानिकाच्या सहकार्याने कोवॅक्सिन लस भारत बायोटेकने तयार केली आहे.

देशात कोवॅक्सिन व कोविशिल्ड लस ताबडतोब बाटली न संपल्यामुळे वाया जाण्याचे प्रमाण अधिक आहे. केंद्राने लस वाया घालवू नये, असे आदेश या अगोदर दिले आहेत. कारण, त्यामुळे लसची कमतरता भासत आहेच पण सरकारला अधिक नुकसान सोसावे लागत आहे. त्यामुळे लस साठवणूक प्रकारात बदल करणे गरजेचे बनले होते. त्यासाठी मेहनत करून मार्ग काढला आहे, असे सांगितले जात आहे.

आजपर्यंत देशात १,४५,४१,४६७ जणांना कोवॅक्सिन लस दिली आहे. तर १४,०६,९५,६७१ जणांना कोवीशिल्ड दिली आहे. लस वाया गेल्यामुळे ८० कोटींचे नुकसान देखील सोसावे लागले आहे, असेही सांगितले जात आहे.