टिओडी मराठी, दि. 3 जून 2021 – कोरोनाविरोधातील लढाईत प्रमुख अस्त्र असणाऱ्या लसीकरण मोहिमेत टपाल विभागाने सामान्य लोकांच्या मदतीसाठी पुढाकार घेतलाय. कोरोना लसीकरणासाठी आता पोस्ट ऑफिसमध्ये देखील नोंदणी करता येणार आहे. ग्रामीण भागात तसेच ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही त्यांच्यासाठी हि सुविधा उपलब्ध केली आहे.
कोरोना रोखण्यासाठी मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगच्या माध्यमातून योग्य ती खबरदारी घेतली जातेय. त्यासह संपूर्ण देशात कोरोना लसीकरण मोहीम सुरू केली आहे.
लसीकरणासाठी नोंदणी करण्यासाठी ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही त्यांना नोंदणी करताना समस्या येत आहेत. ह्या समस्या दूर करण्यासाठी पोस्ट ऑफिसची मदत घेतली जात आहे.
तेलंगणाच्या ग्रामीण भागात हि सुविधा सुरु :
तेलंगणाच्या ग्रामीण भागात नुकतीच ही सुविधा सुरू केली आहे. ज्या लोकांकडे स्मार्टफोन आहेत, पण ते कोविन अॅप योग्य प्रकारे वापरण्यास सक्षम नाहीत, अशा व्यक्तींना याचा फायदा होणार आहे.
तेलंगणातील 36 पोस्ट ऑफिस, 643 सब पोस्ट ऑफिस आणि 10 ब्रँच पोस्ट ऑफिसमध्ये ही सुविधा सुरू केली आहे.