टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 21 मे 2021 – नुकताच ‘द पीपल्स वॅक्सिन अलायंस’ या संस्थेचा रिपोर्ट हाती आला आहे. या रिपोर्टनुसार कोविड लस विक्रीतून झालेल्या फायद्यामुळे जगात 9 नवीन अब्जाधीशांची भर पडलीय. यात पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटच्या पूनावाला यांचाही समावेश केला गेला आहे.
गुरुवारी हा अहवाल सादर झालाय. त्यानुसार या 9 जणांच्या संपत्तीमध्ये सुमारे 19.3 अब्ज डॉलर्स म्हणजे साधारण 141 कोटींची भर पडलीय. ही संस्था विभिन्न संघटना आणि कार्यकर्त्यांचा गट असून या गटाकडून कोविड 19 लसीचे पेटंट संपविले जावे, अशी मागणी सातत्याने केली जातेय.
या गटाच्या म्हणण्यानुसार, नव्या अब्जाधीशानी गरीब देशांना गरजेनुसार लस उपलब्ध करून दिली. तर त्यासाठी येणाऱ्या खर्चापेक्षा त्यांना मिळालेला पैसा दीड पटीने जास्त आहे.
ऑक्सफॅम संघटना या गटची सदस्य असून या संघटनेच्या अॅना मॅरियट असे म्हणतात. लसीचे पेटंट घेऊन लस निर्मिती एकाधिकारातून कमावलेला हा पैसा म्हणजे त्यातील नफ्याचा मानवी चेहरा आहे.
लस विक्रीतून हे नऊ नवे अब्जाधीश जसे बनलेत, त्याचप्रमाणे अगोदर अब्जाधीश असलेल्या अन्य आठ जणांच्या संपत्तीत देखील ३२.३ अब्ज डॉलर्सची वाढ झालीय.
नवीन अब्जाधीशांच्या यादीत मॉडर्नाचे स्टीफन बँरन, बायोएनटेकचे उगुर साहीन यांचा समावेश आहे. चीनी कॅनसिनोचे संस्थापक आणि अन्य दोघे आहेत.
पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटच्या पूनावाला यांची संपत्ती मागील वर्षीच्या २.२ अब्ज डॉलर्स वरून करोना काळात १२.७ अब्ज डॉलर्सवर गेलीय. कॅडिलाचे चेअरमन पंकज पटेल यांची संपत्ती देखील गतवर्षीच्या २.९ अब्ज डॉलर्स वरून ५ अब्ज डॉलर्सवर गेलीय.