SBI ALERT!; आजपासून 23 मे पर्यंत SBI बँकसेवा राहणार बंद; ट्वीट करून दिली माहिती

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 21 मे 2021 – ग्राहकांना कोणत्याही समस्येशिवाय बँकिंगचा अनुभव मिळावा, याकरिता मेंटेनन्सचे काम केले जाते. म्हणून आम्ही काही बँकिंग सेवा 21 मे 2021 पासून 23 मे 2021 पर्यंत काही काळासाठी बंद ठेवणार आहे, असे एसबीआयने ट्वीट करून माहिती दिली आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाचे देशात सुमारे 44 कोटी ग्राहक आहेत. त्यांना स्टेट बँक ऑफ इंडियाने Important Notice अंतर्गत ही संबंधित सूचना जारी केली आहे.

बँकेने यात असे सांगितले आहे की, 21 मे रोजी रात्री 10.45 पासून ते 22 मे रात्री 1 वाजून 15 मिनिटांपर्यंत, त्याचप्रमाणे 23 मे रोजी रात्री 02.40 वाजता ते पहाटे 06.10 वाजेपर्यंत मेंटेनन्सचे काम असणार आहे. बँकेने अशी माहिती दिली आहे की, या दरम्यान एसबीआय ग्राहक INB/YONO/YONO Lite/UPI या सेवांचा वापर करू शकणार नाही.

SBI बँकेकडून अशाप्रकारे मेंटेनन्सची प्रक्रिया केली जाते, जेणेकरून बँक UPI प्लॅटफॉर्म, ऑनलाइन प्लॅटफॉर्म अपडेट करू शकतील. त्यामुळे ग्राहकांना चांगल्या बँकिंगचा अनुभव घेता येणार आहे.

केवायसी (KYC) 31 मे पूर्वी करा अपडेट :
तसेच कोट्यवधी ग्राहकांसाठी एसबीआयने केवायसी अपडेट करण्याची तारीख वाढवलीय. बँकेच्या मते, केवायसी अपडेट करण्यासाठी ग्राहकांना बँकेत जाण्याचीही आवश्यकता नाही. कोरोनामुळे अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन सुरु आहे. अशावेळी ग्राहका पोस्ट किंवा इमेलच्या माध्यमातून केवायसी (KYC) कागदपत्रे जमा करू शकतात.

Please follow and like us: