Sexual Assault Case : तरुण तेजपाल निर्दोष; ‘तहलका’तील सहकारी महिलेने केले होते ‘हे’ आरोप

टिओडी मराठी, पणजी, दि. 21 मे 2021 – ‘तहलका’चे माजी संपादक तरुण तेजपाल यांना लैंगिक अत्याचार केल्याचा आरोपातून गोव्यातील सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्त केलंय.

2013 मध्ये गोव्यामधील लक्झरी हॉटेलच्या लिफ्टमध्ये एका महिला सहकाऱ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तरुण तेजपाल यांच्यावर होता. नोव्हेंबर 2013 मध्ये गोवा पोलिसांनी तरुण तेजपाल यांच्या विरोधात एफआयआर नोंदविला होता, त्यानंतर त्यांना अटक केली.

देशातील कोरोनाच्या परिस्थितीमुळे या प्रकरणाचा निकाल पुढे ढकलला होता. अखेर 21 मे रोजी तरुण तेजपाल यांना निर्दोष मुक्त केलं आहे. मे 2014 पासून तरुण तेजपाल जामीनावर बाहेर होते.

Please follow and like us: