TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 11 ऑगस्ट 2021 – कोरोना विषाणूच्या पहिल्या लाटेपासून जगात अनेक ठिकाणी शाळा बंद आहेत. मुलांच्या आरोग्याकडे पाहून हा निर्णय घेतला होता. परंतु आता याला दीड वर्षे झाली आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी एक ट्वीट करून शाळा सुरू करण्याला प्राधान्य ड्ये, असं आवाहन केलं आहे. मुलांच्या मानसिक, शारीरिक आणि शिकण्याच्या क्षमतेवर मोठ्या कालावधीसाठी प्रभाव राहणार आहे, असे त्या म्हणाल्या आहेत.

मुलांच्या मनसिक, शारीरिक आणि शिकण्याच्या क्षमतेवर अधिक कालावधीसाठी प्रभाव राहिल. सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सर्व मोठ्या व्यक्तींच्या लसीकरणासह शाळा सुरू करण्याला प्राधान्य दयावे. एकत्र जमा होण्यावर आणि सातत्याने हात साफ करण्यासारख्या उपयांचाही वापर करावा, असे सौम्या स्वामीनाथन ट्विटद्वारे म्हणाल्या.

नुकतीच स्वामीनाथन यांनी एका इंग्रजी दैनिकाला मुलाखत दिली होती. त्यावेळीही विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये, यासाठी त्यांनी शाळा सुरू करण्याचे वक्तव्य केलं होतं. समोर येणाऱ्या प्राधान्यक्रमाच्या गोष्टींत शाळा पुन्हा केव्हा आणि कशा सुरू कराव्या? हेही आहे.

गरीब मुलं जर अधिक कालावधीपर्यंत शाळेत गेली नाही, तर याचा प्रभाव जास्त खराब असणार आहे. ते ऑनलाइन शिक्षणाची सुविधा वापरू शकत नाहीत. जर ती मुलं शाळेत गेली नाही, तर पुन्हा ते आपलं शिक्षण सुरू करु शकणार नाही, असेही त्या म्हणाल्या.