TOD Marathi

टिओडी मराठी, वॉशिंग्टन, दि. 11 मे 2021 – अगोदरच चीन देशावर अनेकांची नाराजी आहे. ती म्हणजे कोरोना या आजारामुळे. तरीही चीन काही ना काही कारनामे करत आहे. मात्र, चीनच्या ‘त्या’ कारनाम्याचा त्रास जगाला होत आहे. जगात वैज्ञानिकांसाठी चिंतेचा विषय बनलेले चीनचे रॉकेट दोन दिवसांपूर्वी हिंदी महासागरात कोसळले अन सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. परंतू, या अगोदर हे अनियंत्रित झालेले रॉकेट अंतराळात भरकटले होते.

यावेळी ते आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनच्या अगदी जवळून गेले. अमेरिकेचे अॅस्ट्रोफिजिक्स सेंटरचे खगोलशास्त्रज्ञ जोनाथन मॅकडावेल यांनी चीन देशाच्या या रॉकेटवर नजर ठेवली होती. सोमवारी त्यांनी ट्विट करून या घटनेची माहिती दिलीय.

चिनी रॉकेट पृथ्वीच्या दिशेने येत असताना आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनच्या जवळून गेले. जोनाथन यांनी सांगितले की, चीनचे रॉकेट आणि अंतराळ स्टेशन तिआन्हे वेगळे झाल्यानंतर अवघ्या 6 मिनिटांनी दोन्ही आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनजवळ आले होते. ते 300 किमीच्या परिघात आले होते. जे स्पेस स्टेशनच्या परिक्रमेच्या मार्गानुसार खूप धोकादायक ठरत होते. चिनी रॉकेटला आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनच्या खूप जवळून जाण्यासाठी काही वेळाचीच गरज होती.

याबाबत नासाने सांगितले की, चीन जबाबदार मानकांचे पालन करण्यास फेल ठरला आहे. भारतातही काही लोकांनी चीनचे रॉकेट कोसळताना पाहिल्याचा दावा केलाय. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी रॉकेटचे अवशेष मालदीवच्या समुद्रात कोसळल्याचे म्हटलंय . नासाचे प्रशासक बिल नेल्सन यांनी चीनची कडवी निंदा केलीय. चीन व अन्य देश अंतराळात वावरताना जबाबदारीने आणि पारदर्शकतेने वागण्याची आवश्यकता आहे, असे हि ते म्हणाले आहेत.

चिनी रॉकेटच्या या कृतीमुळे ते अनियंत्रित झाले की मुद्दामहून केले गेले, या शंकेला वाव मिळालाय. या धोक्याच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनच्या सहकारी देशांना याची माहिती दिलेली नाही. कारण, अगोदर जगभरातील देश हे रॉकेट कुठे कोसळेल? याच्या चिंतेमध्ये होते.

8 एप्रिलला सायंकाळी 4 च्या सुमारास (अमेरिकी वेळानुसार) हे रॉकेट मालदीवजवळच्या समुद्रात कोसळले. अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने चीनच्या महत्वाकांक्षी कार्यक्रमावरून चीनला कठोर शब्दांत फटकारले.