टिओडी मराठी, दि. 26 मे 2021 – केंद्रीय कृषी कायद्याविरोधात तमिळनाडू विधासभेत प्रस्ताव आणणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी केलीय. हे तीनही कायदे मागे घ्यावेत, अशी मागणी तमिळनाडू विधानसभेत करणार आहे.
याबाबत निवडणूकीपूर्वी स्टॅलिन यांनी वचन दिले होते की, आपण सत्तेत आल्यास या कायद्याला विरोध करू. शेतकरी आंदोलनाला आज सहा महिने पूर्ण झाले. शेतकरी संघटना आजचा दिवस काळा दिवस म्हणून साजरा करत आहे. काँग्रेस शासित पंजाब, राजस्थान आणि छत्तीसगड राज्यांनी याअगोदर कृषी कायद्याविरोधात प्रस्ताव पारित केलाय.
निवडणूकीपूर्वी द्रमुकचे अध्यक्ष एम के स्टॅलिन यांनी कृषी कायद्याचा विरोध केलाय तसेच आपले सरकार आल्यास हे तीनही कायदे मागे घेण्यास आम्ही प्रस्ताव आणू, असे वचनही दिले होते. मागील 6 महिन्यांपासून शेतकरी संघटनांचा या कायद्यांविरोधात आंदोलन सुरूय.
केंद्र सकारची आणि शेतकरी संघटनांची यावर चर्चाही झाली. पण, काहीच निष्पण्ण झालेले नाही. तमिळनाडूत अगोदर अण्णा द्रमुकचे सरकार होते. अण्णा द्रमुक भाजपचा मित्र पक्ष असून त्यांनी या कायद्याचे समर्थन केले होते.