TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 26 मे 2021 – महाराष्ट्र राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेच्या कर्मचार्‍यांना लोकल प्रवासाची परवानगी आहे, असे असताना बरेच जण विनातिकीट तसेच बनावट ओळखपत्र घेऊन प्रवास करताना आढळले आहेत. अशा 75 हजार प्रवाशांवर रेल्वेने कारवाई करत कोट्यवधींचा दंड वसूल केलाय, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली अहे.

मागील दोन महिन्यांत बेकायदेशीररित्या प्रवास करणार्‍यां 75 हजार 793 प्रवाशांविरोधात मध्य रेल्वेने कारवाई केलीय. या प्रवाशांकडून सुमारे 3 कोटी 97 लाख रुपये दंड वसूल केला आहे.

14 एप्रिल 2021 पासून सामान्य प्रवाशांना लोकल प्रवास बंद केला आहे. तेव्हापासून केवळ अत्यावश्यक सेवेच्या कर्मचार्‍यांना लोकल प्रवासाची परवानगी दिली आहे.

17 एप्रिल ते 21 मे 2021 दरम्यान मास्क न लावलेल्या 1 हजार 61 प्रवांशाविरोधात कारवाई केली आहे. 808 प्रवासी खोटे ओळखपत्र दाखवून प्रवास करत होते. अशा प्रवांशाकडून 500 रुपये दंड आकारला आहे.