TOD Marathi

टिओडी मराठी, लातूर, दि. 26 मे 2021 – परिस्थितीवर मत करून डॉक्टर बनणाऱ्या राहुल पवारांची कोरोनाशी झुंज अखेर अयशस्वी झाली. कोरोनासोबतच्या लढ्यात राहुल गंभीर असल्यानं उपचार सुरु होते. आज सकाळी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला आहे.घराच्या गरीब परिस्थितीपुढे न झुकणाऱ्या राहुलचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त होतेय. तो एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात शिकत होता. आई वडिल उसतोड कामगार म्हणून काम करतात.

परभणीच्या पाथरी येथील आनंदनगर तांड्यावर राहणारा डॉक्टर राहुल पवार आई वडिलांना उसतोड कामात मदत करायचा. अलिकडेच त्याने एमबीबीएसच्या तृतीय वर्षाची परीक्षा दिली होती. या दरम्यान त्याला कोरोनाची लागण झाली. त्याला कोरोनासह म्युकरमायकोसिसचा संसर्गही झाला होता.

मागील एक महिन्याहून अधिक काळ तो औरंगाबाद येथील एमजीएम रुग्णालयात उपचार घेत होता. त्याची घरची परिस्थिती बिकट होती. त्याच्या उपचारासाठी मित्रांनी आणि महाविद्यालयाने निधीही गोळा केला होता. पण, त्याची कोरोनाशी लढाई अपयशी ठरली. त्यानं आज उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.

परभणीच्या पाथरी तालुक्यातील आनंदनगर तांडा इथला रहिवासी असणारा राहुल विश्वनाथ पवार लातूरमधील एमआयटी कॉलेजमधून एमबीबीएसचे शिक्षण घेतं होता.