टिओडी मराठी, मुंबई, दि. 21 ऑगस्ट 2021 – केंद्र सरकारची कामं जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी भाजपने जन आशीर्वाद यात्रा सुरु केली. मात्र, या यात्रेवर पोलिसांनी 36 हून अधिक गुन्हे दाखल केले आहेत. अशाप्रकारे भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेला मुंबई पोलिसांनी दणका दिला आहे.
कोविडच्या पार्श्वभूमीवर गर्दी जमवायला परवानगी नाही, तरी देखील भाजपने जन आशीर्वाद यात्रा काढली. या पार्श्वभूमीवर मुंबईत 36 ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत.
19 ऑगस्ट रोजी विलेपार्ले, खेरवाडी, माहीम, शिवाजी पार्क, दादर, चेंबूर, गोवंडी पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. त्यानंतर आता गुन्ह्यांची संख्या 36 वर पोहोचली असून जन आशीर्वाद यात्रेची परवानगी नसतानाही ती काढल्याने पोलिसांनी ही कारवाई केलीय.
केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या स्वागतासाठी मंगळवारी संध्याकाळी भाजपच्या नवी मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी महापालिका मुख्यालयापासून जनआशीर्वाद यात्रा काढली होती.
या यात्रेत कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यामुळे एनआरआय पोलिसांनी आयोजकांसह 70 ते 80 भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केले आहेत.