नवी दिल्ली: ओबीसी आरक्षणावरील ठरावावर चर्चा सुरू असताना राजदंड उचलणे, माईक खेचणे आणि तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्यावर शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर धावून गेल्याच्या आरोपामुळे भाजपच्या बारा आमदारांचं 5 जुलै 2021 ला वर्षभरासाठी निलंबन करण्यात आलं होतं. तर हे निलंबन विधानसभा अध्यक्षांनी केला होत.
राज्यातील 12 आमदारांच निलंबन केल्याप्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय देत या १२ आमदारांच निलंबन रद्द करणअयाचा निर्णय दिला आहे.
आमदारांना अधिवेशनाबाहेर निलंबित करण्याचा ठराव ‘असंवैधानिक’, ‘बेकायदेशीर’ आणि ‘विधानसभेच्या अधिकारांच्या पलीकडे’ आहे, अस सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे भाजपला मोठा दिलासा मिळाला असून महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला आहे.
निलंबन केलेल्या १२ आमदारांमध्ये यांचा समावेश होता.
आशिष शेलार (वांद्रे पश्चिम)
अभिमन्यू पवार (औसा)
गिरीश महाजन (जामनेर)
पराग अळवणी (विलेपार्ले)
अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व)
संजय कुटे (जामोद, जळगाव)
योगेश सागर (चारकोप)
हरीश पिंपळे (मूर्तीजापूर)
जयकुमार रावल (सिंधखेड)
राम सातपुते (माळशिरस)
नारायण कुचे (बदनपूर, जालना)
बंटी भांगडिया (चिमूर)