TOD Marathi

कर्नाटक: कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस.येडियुरप्पा यांच्या नातीने गळफास घेतल्याचं समोर आल आहे . सौंदर्याचा बेंगळुरूतील एका खासगी अपार्टमेंटमध्ये लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला असून तिच्या मृत्यूचं कारण अजूनही समोर आलेलं नाही. संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. ही आत्महत्या आहे की हत्या असल्याचा तपास पोलीस अधिकारी करत आहेत. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी लेडी कर्झन हॉस्पिटलमध्ये नेल्याची माहिती येडियुरप्पा यांच्या कार्यालयाने दिली आहे.

पोलिसांनी त्यांच्या तपासाचा वेग वाढवत तपासला सुरुवात केली आहे. मृत्यूचं कारण अद्यापही समोर आलेले नसून एकूण प्रकरणाचं गूढ कायम असल्याचं समजत आले आहे. त्यामुळे ही आत्महत्या असल्याची अद्याप कोणतीही खात्री दिली जात नाही.

बी.एस. येडीयुरप्पांनी कर्नाटकचे 19 वे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळत होते. शिकारीपुरा या मतदारसंघातून ते कर्नाटक विधानसभेचे सदस्य म्हणून काम पाहतात. कर्नाटकात आतापर्यंत चार वेळा मुख्यमंत्री आणि तीन वेळा कर्नाटक विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. हे कार्य करणारे ते एकमेव राजकारणी आहेत. ते शिमोगा जिल्ह्यातील शिकारीपुरा मतदारसंघातून आमदार आहेत. या मतदारसंघातून ते आठ वेळा निवडून आले आहेत.