६ फेब्रुवारीपासून भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. तर दुखापतीतून सावरत संघात पुनरागमन केलेल्या रोहित शर्मा कडे संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. सोबतच ऑफ स्पिन बॉलर कुलदीप यादव अशीही संघात पुनरागमन झाले आहे.
नवीन संघ निवडताना संघातील प्रमुख गोलंदाज जसप्रीत गुमराह आणि मोहम्मद शमी या यांना दोन्ही मालिकांमधून आराम देण्यात आला आहे. रवींद्र जडेजा अद्याप दुखापतीतून सावरलेल्या नसल्याने त्यालाही संघात सामील होता आले नाही. मात्र के एल राहुल दुसरा वन डे सामना पासून संघात उपस्थित राहणार आहे. यासोबतच U-19 वर्ल्डकप मध्ये आपला ठसा उमटवणारा लेग स्पिनर याचीही T-20 मालिकेसाठी पहिल्यांदाच भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.
वेस्ट इंडिज च्या भारत दौऱ्यासाठी भारताच्या एकदिवसीय संघात रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दीपक चहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान इत्यादींची निवड करण्यात आली आहे. तर,
T-20 सामन्यांसाठी संघात रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), इशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, हर्षल पटेल इत्यादी खेळाडू असणार आहेत.