Asia Cup 2022 : जपानला धूळ चारत भारतानं कांस्य पदकावर कोरलं नाव

नवी दिल्ली : आशिया कपमध्ये भारतीय हॉकी संघाने कांस्य पदकावर नाव कोरलेय. भारताने पुन्हा एकदा जपानचा 1-0 असा पराभव केला. मंगळवारी भारताने दक्षिण कोरियाविरोधातील सामना 4-4 असा बरोबरीत सोडला होता. त्यामुळे भारताचे फायनलमधील आव्हान संपुष्टात आले होते. त्यामुळे आज भारत जपानविरोधात कांस्य पदाकासाठी मैदानात उतरला होता. जपानविरोधात बुधवारी झालेल्या सामन्यात भारताने 1-0 च्या फरकाने मात मारत कांस्य पदकावर नाव कोरलेय.

हॉकी आशिया कपमध्ये भारत आणि जपान यांना एकाच गटात ठेवण्यात आले होते. दोन्ही संघामध्ये साखळीमध्ये पहिला सामना झाला होता. तेव्हा भारतीय संघाला 2-5 च्या फरकाने पराभव झाला होता. त्यानंतर सुपर 4 मध्ये भारतीय संघाने 2-1 ने विजय मिळवत पराभवाचा वचपा काढला होता. दोन्ही संघात या स्पर्धेत तिसऱ्यांदा लढत झाली.. यामध्ये भारतीय संघाने 1-0 च्या फरकाने विजय मिळवला. यासह या स्पर्धेत भारतीय संघाने कांस्य पदाकावर समाधान मानलेय.

सुपर 4 मध्ये भारतीय संघाने जपानचा पराभव केला होता. त्यामुळे कांस्य पदाकाच्या सामन्यात भारतीय संघाने सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला.  राजकुमारने जापानविरोधात पहिला आणि एकमेव गोल करत भारतीय संघाला आघाडी मिळवून दिली. भारतीय संघाने पहिल्या कॉर्टरच्या अखेरपर्यंत आपली आघाडी कायम ठेवली.

Please follow and like us: