TOD Marathi

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीने चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. या दोघांनाही 8 जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास ईडीने सांगितले आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे. काँग्रेसने हे सूडाचं राजकारण असल्याचे म्हटले आहे.

काँ kiग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या चौकशीला सामोरे जाणार असल्याची माहिती काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी दिली. काँग्रेस नेते राहुल गांधी हे सध्या परदेश दौऱ्यावर आहेत. आठ जूनपर्यंत राहुल गांधी परतल्यास तेही चौकशीला सामोरे जातील.

दरम्यान नॅशनल हेराल्ड’ हे वर्तमानपत्र पंडित जवाहरलाल नेहरु यांनी सुरू केले होते. हे काँग्रेसचं मुखपत्र समजले जायचे. काही काळातच हे वर्तमानपत्र बंद पडले. मात्र, 2012 मध्ये सोनिया आणि राहुल गांधींच्या ‘यंग इंडिया’ या कंपनीने या वर्तमानपत्राचे हक्क पुन्हा विकत घेतले. मात्र, हे सुरू करण्यात आले नव्हते. हे हक्क घेताना 1600 कोटींची संपत्ती फक्त 50 लाखांत घेतल्याचा आरोप भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला होता. त्या प्रकरणी चौकशी सुरू आहे.