TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 15 मे 2021 – जगात कोरोनाचा कहर वाढत असल्यामुळे त्याचा फटका औद्योगिक क्षेत्राला बसला आहे. यामुळे अनेक कंपन्या आर्थिक संकटात सापडल्या आहेत. अशात जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी ‘अ‍ॅमेझॉन’ने अधिक प्रमाणात नोकऱ्या देण्याचा निर्णय घेतलाय. अ‍ॅमेझॉन कंपनी भारतासह काही देशांत 75 हजार लोकांना रोजगार देणार आहे. प्रतितास 15 डॉलर किमान वेतन वाढवून 17 डॉलर करण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत अ‍ॅमेझॉनने दिलेल्या माहितीनुसार, कंपनी सुमारे 75 हजार लोकांची भरती करणार असून वेयरहाऊस स्टाफपासून ते डिलिव्हरी ड्रायव्हरपर्यंतची ही पदे असणार आहेत.

कोराना काळात लोक घरांत अडकून पडले आहेत. त्यामुळे ऑनलाईन ऑर्डरची मागणी वाढत आहे. अ‍ॅमेझॉन कंपनीने नव्या लोकांना कामाकडे आकर्षित करण्यासाठी पगारवाढीची योजना तयार केलीय.

प्रतितास 15 डॉलर किमान वेतन वाढवून 17 डॉलर करण्याचा निर्णय घेतला असून सर्व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची योग्य ती खबरदारी घेतली जात आहे, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.