टिओडी मराठी, दि. 28 मे 2021 – जगात ई-कॉमर्स क्षेत्रातील नामांकित कंपनी अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस येत्या 5 जुलै 2021 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदाचा राजीनामा देणार आहेत. तर अमेझॉनच्या वेब सर्व्हिसेसचे प्रमुख अँडी जेसी यांच्याकडे नव्या सीईओ पदाची सूत्रे देणार आहे, असे देखील त्यांनी नुकतेच जाहीर केलं आहे.
अमेझॉनच्या भागधारकांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत जेफ बेझोस यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली.
या दरम्यान, 27 वर्षांपूर्वी याच दिवशी अमेझॉनची स्थापना केल्याने हा दिवस भावनिकदृष्टय़ा महत्त्वाचा आहे. आपण या दिवसाची निवड केली आहे, अशी माहिती बेझोस यांनी दिली.
या दरम्यान, जेफ बेझोस 5 जुलै 2021नंतर नेमकी कोणती सूत्रे हाती घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.