टिओडी मराठी, दि. 17 जून 2021 – ॲमेझॉनचे सीईओ जेफ बेजोस यांच्या माजी पत्नी मेकेंझी स्कॉट यांनी सुमारे 19,800 कोटी रुपये दान केले आहेत. जगातील श्रीमंत महिलांच्या यादीमध्ये सामील असलेल्या मेकेंझी यांचे 1 वर्षातले हे तिसरे मोठे दान आहे. त्यांनी दान केलेल्या 2.7 अब्ज डॉलर्स म्हणजे 19,800 कोटी रुपयातून भारतासह अनेक देशातील 286 संस्था, विद्यापीठे, कला समूहांना मदत दिली जाणार आहे.
याबाबत मेकेंझी यांनी ब्लॉग पोस्ट केलाय. त्यात जगासाठी काही चांगले करायचे असेल तर संपत्ती मुठभर लोकांच्या हातात राहून चालणार नाही, असे म्हंटलं आहे. मेकेंझी यांची स्वतःची कोणतीही परोपकारी संघटना नाही. खासगी पातळीवर त्या वेळोवेळी मोठ्या रकमा दान करतात.
२०१९ मध्ये बेजोस यांच्यापासून घटस्फोट घेतल्यावर मेकेंझी यांच्या वाटणीला ॲमेझॉनचे ४ टक्के शेअर्स आले. त्यावेळी त्याची किंमत ३६ अब्ज डॉलर्स होती पण, काही काळात शेअर किमंत वाढली आणि आता त्या शेअर्सची किंमत ६० अब्ज डॉलर्सवर गेली आहे.
मेकेंझी यांनी मागील ११ महिन्यात ८ अब्ज डॉलर्स दान केलेत. त्यांनी ५०० संस्थांना ६ अब्ज डॉलर्स २०२० या वर्षात दिलेत. मेकेंझी दान, मदत मिळण्यासाठी गरजूंकडून अर्ज वगैरे मागवत नाहीत. दान दिलेल्या संस्थांची थेट यादी जाहीर केली जाते.
More Stories
मुस्लिम देशांनी भारताची केली कोंडी; मोहम्मद पैगंबर वादग्रस्त वक्तव्याचा ‘या’ देशांकडून निषेध
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या हत्येचा कट?; कलम 144 लागू
जगप्रसिध्द जॉनी-एम्बर मानहानीच्या खटल्यात जॉनी डेप विजयी, निकालाचे जगभरातून स्वागत