TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 28 मे 2021 – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गुरुवारी त्यांचा वार्षिक रिपोर्ट जारी करून या रिपोर्टमध्ये आरबीआयने आता आर्थिक व्यवहारासाठी कोणत्या नोटा आणि किती सिक्के वापरात आहेत, हे सांगितलं आहे. बाजारात 2 हजारांच्या नोटेवर प्रतिबंध लावलेले नाहीत. आरबीआयने 2 हजारांच्या नोटेवर बंदी आणली आहे, अशी अफवा काही दिवसांपासून पसरली होती.

आरबीआयच्या रिपोर्टनुसार, बाजारात 2, 5, 10, 20, 50, 100, 200, 500 आणि 2000 रुपये नोट जारी केलेत. त्यासह बाजारात ५० पैसे सिक्का चलनात नाही, परंतु आरबीआयने याबाबतही स्पष्टीकरण दिलंय.

आरबीआयनुसार आता बाजारात ५० पैसे, १ रुपये, २, ५, १० आणि २० रुपयांचे सिक्के चलनात आहेत. आरबीआयकडून ते जारीही केले जात आहेत. त्यातील कोणतेही सिक्के चलनातून बाहेर केले गेलेले नाहीत.

बाजारात किती नोटा आहेत?
सध्या बाजारात जेवढ्या नोटा आहेत, त्यातील कोणती नोट किती प्रमाणात आहे? हेही आरबीआयने स्पष्ट केलंय. आर्थिक बाब पाहिली तर बाजारात ५०० आणि २ हजारांच्या बँक नोटा ८५.७ टक्के चलनात आहेत. म्हणजे देशात जितके बँक नोट आहेत, त्यात ८५.७ टक्के ५०० आणि २००० बँक नोटा आहेत.

३१ मार्च २०२० पर्यंत हे प्रमाण ८३.४ टक्के इतके होते. ५०० रुपयांच्या नोटा अधिकरीत्या चलनात उपलब्ध आहे. त्यानंतर १० रुपयांच्या नोटांचे प्रमाण अधिक आहे. त्या बाजारामध्ये २३.६ टक्के चलनात आहेत.

प्रिटींगवर खर्च कमी :
या रिपोर्टमध्ये असं सांगितलं आहे की, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ९.७ टक्क्यांनी नोटांच्या चलनात घट झालीय. १ जुलै २०२० ते ३१ मार्च २०२१ पर्यंत सिक्युरिटी प्रिटिंगवर एकूण ४ हजार १२ कोटी रुपये खर्च झाले आहेत.

गेल्या वर्षी जुलै २०१९ ते जून २०२० पर्यंत प्रिटिंगवर ४ हजार ३७७ कोटी रुपये खर्च झाले आहेत. २०२० ते २०२१ कालावधीमध्ये २ लाख ८ हजार ६२५ बनावट नोटा पकडल्या आहेत.

कोरोनामुळे ‘त्या’ नोटा बदलण्यास विलंब :
करंसी नोट आणि सिक्का जारी करण्याचे काम आरबीआय करत आहे. त्याचे व्यवस्थापनही आरबीआय करत असते. या कामात ऑफीस, करंसी चेस्ट, स्मॉल कॉइन डिपॉझिट महत्वाची भूमिका निभावते.

३१ मार्च २०२१ पर्यंत देशात स्टेट बँक ऑफ इंडियाकडे करेंसी चेस्ट नेटवर्कचा ५५ टक्के भाग आहे जो सर्व बँकांपेक्षा जास्त आहे. या कोरोनामुळे नोटा बदलण्याबाबत विलंब झाला आहे. परंतु आता सर्व सुरळीत केले आहे, असे जुन्या आणि फाटलेल्या नोटांबद्दल आरबीआयने सांगितलं आहे.