टिओडी मराठी, मॉस्को, दि. 17 जुलै 2021 – रशियाच्या भरकटलेल्या प्रवासी विमानातील सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुखरुप आहेत. शुक्रवारी उड्डाण केल्यानंतर या विमानाकडून इमर्जन्सी लँडिंगची मागणी केली होती. मात्र, विमानतळावर पोहोचण्यापूर्वी हे विमान भरकटून बेपत्ता झालं होतं. ते विमान सापडल्यामुळे दिलासा मिळाला आहे.
शुक्रवारी उड्डाण केलेल्या या विमानामध्ये एकूण 18 प्रवासी होते. त्यापैकी 15 प्रवासी आणि 3 क्रू मेंबर्स होते. सायबेरिअन भागातील टोम्स या ठिकाणी वैमानिकाने या विमानाचं सेफ लँडिंग केलं.
या विमानातील सर्व 15 प्रवासी आणि 3 क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत. आता त्यांना त्चांच्या मुक्कामी पोहोचवले आहे, असे रशियाच्या सरकारकडून सांगितले आहे.
‘हे’ होतं विमान :
हे विमान AN-28 या प्रकारातलं होत. तसेच 2012 सालच एक विमान क्रॅश होऊन 10 जणांचा मृत्यू झाला होता. रशियन बनावटीचे हे विमान असून देशांतर्गत वाहतुकीसाठी त्याचा वापर केला जातो. स्थानिक इला एअरलाईन्सच्या मालकीचे हे विमान आहे.
या अगोदर या विमानाचा झाला होता अपघात :
काही दिवसांपूर्वी रशियाच्या AN-26 या विमानाला अपघात होऊन 28 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. हे अपघातग्रस्त विमान ऍंटोनोव्ह कंपनीचं होतं. 1969 ते 1986 या काळात ही विमानं तयार केली होती.
सैनिकांची ने-आण करण्यासाठी उपयुक्त ठरणारी ही विमानं होती. ही विमानं जुनी झाल्यामुळे ती आंतरराष्ट्रीय सेवेतून बाद करून केवळ देशांतर्गत सेवेसाठी वापरण्यात येत होती. विमानांना सेवेत घेण्याचे निकष रशियाने काही दिवसांपूर्वी कडक केले आहेत. मात्र, तरीही हा अपघात झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.