TOD Marathi

टिओडी मराठी, काबूल, दि. 16 ऑगस्ट 2021 – अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये तालिबान बंडखोरांच्या प्रवेशानंतर हजारो लोकांची गर्दी काबूल विमानतळावर दिसून येत आहेत. अनेक देशांमधील राजकारणी व्यक्तींना काबूल विमानतळावरून सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. विमानतळावर गोळीबार केल्याची माहिती देखील समोर येत आहे. त्यामुळे विमानतळावर लोकांची पळापळ सुरू होती. सध्या या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

तर काबूलमधील अमेरिकन दूतावासाजवळ दोन मोठे स्फोट झाले आहेत. या स्फोटात कोणी जखमी किंवा ठार झाले की नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती अजून मिळालेली नाही. अमेरिकेने आपल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी लपण्यासाठी सांगितले आहे. यासह, काबूल विमानतळावर गोळीबारही झालाय, त्यामुळे काबूल विमानतळावर आग लागली आहे.

काबूलमधील 11 जिल्ह्यांवर वर्चस्व प्रस्थिपित केल्यानंतर तालिबानने सर्व व्यवसायिक उड्डाणांवर बंदी आणलीय.

त्यासह विमानतळावर उपस्थित असलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी लष्कराची विमाने मदतीसाठी पोहोचलेत. अमेरिकेच्या एका लष्करी अधिकाऱ्याने ही माहिती दिलीय.