TOD Marathi

भूकंपाने Haiti देश हादरला ; 1297 जणांचा मृत्यू, 2 हजार पेक्षा अधिक लोक जखमी

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, दि. 16 ऑगस्ट 2021 – हैती देशामध्ये शक्तीशाली भूकंप झाल्याने सुमारे 1 हजार 297 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 2 हजार 800 पेक्षा लोक जखमी झाले आहेत. 7.2 रिश्टर स्केल इतका शक्तीशाली हा भूकंप होता. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात असून बचावकार्य वेगाने सुरु आहे.

अमेरिकेनजीकच्या अटलांटिक महासागरातील हैती या देशात भूकंप झाला आहे. त्यामुळे अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेने तात्काळ मदत पोहचली आहे. या भूकंपाच्या धक्क्यामुळे अधिक प्रमाणात जीवित तसेच वित्तहानी झाली आहे.

शनिवारी पहाटे ५.२७ वाजता अमेरिकेच्या आलास्कामध्येही भूकंपाचे झटके बसले. त्याची तीव्रता ६.९ रिश्टर स्केल होती. या भूकंपामुळे 800 पेक्षा जास्त घरं जमिनदोस्त झालीत. तर शेकडो घरांना तडे गेलेत. पंतप्रधान एरियल हेनरी यांनी नागरिकांना तात्काळ मदत करण्याचे आदेश दिलेत.