ADR चा अहवाल जाहीर ; Narendra Modi यांच्या मंत्रिमंडळातील 33 मंत्र्यांविरोधात दाखल आहेत गुन्हे !

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 10 जुलै 2021 – मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार अखेर बुधवारी पार पडला. बुधवारी एकूण 43 मंत्र्यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली, त्यामुळे केंद्रीय मंत्र्यांची एकूण संख्या आता ७८ झालीय. पण, यापैकी सुमारे ४२ टक्के अर्थात ३३ मंत्र्यांविरोधात गुन्हे दाखल आहेत. त्यातील २४ जणांविरोधात हत्या, हत्येचा प्रयत्न, दरोडा यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. नुकताच यासंदर्भातीस अहवाल ADR अर्थात Association For Democratic Reforms ने जाहीर केला आहे.

त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळासंदर्भातील माहिती दिली आहे. त्यानुसार वरील निष्कर्ष मांडले आहेत. असोसिएशन फॉर डेमॉक्रेटिक रिफॉर्म्सकडून (एडीआर) अशा प्रकारचे अभ्यास अहवाल प्रकाशित केले जात असतात.

एडीआरच्या ताज्या अहवालानुसार, एकूण ७८ केंद्रीय मंत्र्यांपैकी ३३ मंत्र्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत. याशिवाय २४ मंत्र्यांविरोधात हत्या, हत्येचा प्रयत्नसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या सर्वांनी निवडणुकीच्या वेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीवरून हा निष्कर्ष काढला आहे.

या दरम्यान, यंदाच्या मंत्रिमंडळातील सर्वात तरुण मंत्री ठरलेले ३५ वर्षीय निसित प्रामाणिक यांच्याकडे केंद्रीय गृहराज्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवली आहे. पण, त्यांच्या विरोधात भादंविच्या कलम ३०२ नुसार हत्येचा गुन्हा दाखल झालेला आहे. याशिवाय जॉन बारला, पंकज चौधरी आणि व्ही मुरलीधरन या तिघांविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे.

त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळात अधिक मंत्री आणि खासदार हे गुन्हेगार प्रवृत्तीचे आहेत का? त्यांच्यावर दाखल असलेले गुन्हे पाहून असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

Please follow and like us: