टिओडी मराठी, सातारा, दि. 10 जुलै 2021 – जरंडेश्वरच्या कर्ज प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला ईडीची नोटीस आली आहे. जरंडेश्वर प्रकरणी ईडी आता अॅक्शन मोडवर आली आहे.
साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यातील चिमणगावमधल्या चर्चित जरंडेश्वर कारखान्याच्या कर्ज प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ईडीने जोर लावला आहे, त्यासाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला नोटीस पाठवली आहे.
सातारा जिल्हा बँकेने जरंडेश्वरला सुमारे 96 कोटींचे कर्ज दिले आहे, या खुलाशाबाबत ही नोटीस बजावली आहे. जिल्हा बँकेने कर्ज देताना कोणत्या आधारावर दिलं?, कागदपत्रांची पूर्तता नेमकी कशी केली होती?, कर्ज प्रकरणाची प्रोसेस नेमकी कशी झाली?, ही प्रोसेस होताना नियम आणि अटींचं पालन झालं होतं का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे ईडीला शोधायची आहेत. म्हणून त्या पद्धतीने ईडी तपास करणार आहे, असं समजतंय.
या जरंडेश्वर साखर कारखान्याशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा संबंध आहे, असं आढळल्यामुळे ईडीने तपासाचा जोर लावला आहे. ईडी कार्यालय हे केंद्राच्या हातात असल्यामुळे आणि केंद्रात भाजपची सत्ता आहे.
त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारला फोडण्यासाठी भाजप ईडीच्या माध्य्मातून जरंडेश्वरच्या कर्ज प्रकरणाची चौकशी लावून त्यातील सत्य बाहेर काढणार आहे.
कोण कोणत्या मार्गाने पैशाचा व्यवहार आणि अपहार करत आहे? याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे पाऊल ईडी उचलते. आता सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला देखील नोटीस पाठवून ईडी सविस्तर माहिती घेणार आहे, असे समजते.