TOD Marathi

टीओडी मराठी, लातूर, दि. 13 मे 2021 – लातूर येथील आदर्शमैत्री फाऊंडेशनच्या वतीने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये काम करणाऱ्या फ्रंटलाईन वर्कर यांना फेसशिल्ड आणि सॅनिटायजरचे वाटप करण्यात आले. आदर्शमैत्री फाऊंडेशनचे अध्यक्ष संतोष बिराजदार यांच्या संकल्पनेतून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला आहे.

सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रत्यक्षात रस्त्यावर पब्लिकमध्ये काम करणाऱ्या व्यक्ती, त्यात पोलीस कर्मचारी, ऑटो चालक, हातगाडे, पेट्रोल पंपावर काम करणारे कर्मचारी, फळे विक्रेते आदींचा लोकांशी थेट संपर्क येतो. अशा सुमारे 250 व्यक्तींना कोरोनापासून बचाव करण्यासाठी फेस शिल्ड आणि सॅनिटायजरचे वाटप करण्यात आले.

सामाजिक कार्यात सतत अग्रेसर आदर्शमैत्री फाऊंडेशन आहे. आपण या समाजातील घटक असून समाजासाठी आपणही काहीतरी देणं लागतो, या भावनेतून आदर्शमैत्री फाऊंडेशनचे अध्यक्ष संतोष बिराजदार यांच्या संकल्पनेतून नेहमी नवनवीन उपक्रम राबवण्यात येत असतात.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत हातावर पोट असणाऱ्या सुमारे ३०० कुटुंबास एक महिना पुरेल इतके अन्नधान्याचे किट वाटप केले. तर, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक पेशंटच्या नातेवाईकास जेवणाची सोय उपब्धत करून देणे, बेड उपलब्ध करुन देणे आदी उपक्रमासह जे फ्रंटलाईन वर्कर आहेत त्यांना कोरोनापासून बचावासाठी फेस शिल्ड आणि सॅनिटायजर वाटप केले.

यावेळी आदर्शमैत्री फाऊंडेशनचे अध्यक्ष संतोष बिराजदार, आदर्शमैत्री फाऊंडेशनचे संचालक अमोल जाणते, आसिफ शेख, महादेव पांडे, पदमाकर वाघमारे, अविष्कार हालसे, कृष्णा अंधारे, मदन भगत आदी मान्यवर उपस्थित होते.