मुंबई: कोरोनाच्या महामारीमुळे गेल्या अडीच वर्षांपासून शाळा बंद होत्या. अखेर ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. पण, ‘विद्यार्थ्यांना शाळेत हजर राहण्याची सक्ती नाही. पालकांच्या संमतीशिवाय विद्यार्थ्यांनी शाळेत येऊ नये, कोरोनाची संपूर्ण खबरदारी घेऊनच विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे, असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.
राज्यातील शाळा अखेर सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार आता येत्या 4 ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा सुरू होणार आहेत. शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता मिळाली आहे. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत वर्षा गायकवाड यांनी संपूर्ण नियमावली वाचून दाखवली आहे.
कोरोनाचे नियम पाळून शाळा सुरू करत आहोत. पालकांच्या संमतीशिवाय बालक शाळेत येऊ नये. निवासी शाळांसाठी हा निर्णय नाही. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी लसीकरण करावं याकडे लक्ष असेल, यासाठी ८ दिवसांचा कालावधी आहे, असं वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं.