TOD Marathi

नागपूर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गुरुवारी झालेल्या भेटीवरुन राज्याच्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं होतं. मात्र आता देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या भेटीबाबतचा खुलासा केला आहे.

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, कालची बैठक केवळ ओबीसी आरक्षणासाठीच होती. यामध्ये कुठलीही राजकीय चर्चा नव्हती. असं फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. तसेच, न्यायालयात आरक्षण टिकावे यासाठी काल आपण काही सूचना केल्या असल्याचे फडणवीसांनी सांगितले आहे.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात गुरूवारी सविस्तर चर्चा झाली. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा उपस्थित होते. दरम्यान, मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते यांच्यातील भेटीवरून पुन्हा एकदा विविध राजकीय चर्चा रंगत असताना, आज नागपुरात माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीबाबत माहिती दिली आहे.