TOD Marathi

मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे त्यामुळे आता राज्यात पुन्हा एकदा शाळा तसेच महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत. मात्र अजूनही पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करण्यात आल्या नाहीयेत. आता त्या लवकरच सुरू करण्याचा निर्णय वर्षा गायकवाड घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

सर्व जिल्ह्यातल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची टप्प्याटप्प्यानं शाळा सुरु करत असताना जिल्ह्यातल्या शाळांचा आढावा घेण्यासाठी ऑनलाईन बैठक घेतली. या बैठकीत अधिकाऱ्यांनी इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा पुन्हा सुरू करण्यावर जोर दिला आहे. दरम्यान मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि कोविड टास्क फोर्ससोबत चर्चा केल्यानंतर शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.

वर्षा गायकवाड यांनी या बैठकीत सांगितलं, जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक आणि भौतिक विकास करून आदर्श शाळा योजना राबविणं. तसंच निजामकालीन शाळांचा विकास करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. तसंच शाळांच्या पायाभूत सुविधांबरोबरच शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे सरकारचं उद्द‍िष्ट असल्याचं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.