टिओडी मराठी, काबूल, 1 सप्टेंबर 2021 – तालिबानने बंदूकीसह हिंसेच्या जोरावर अफगाणिस्तानवर ताबा मिळवला. तालिबान्यांना अफगाणिस्तानामध्ये शांतता प्रस्थापित करण्याचा दावे करणाऱ्या तालिबान्यांनी पंजशीरवर हल्ला केलाय. बंदूक आणि हिंसेच्या जोरावर तालिबान्यांना पंजशीरवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी तालिबानी पंजशीरमध्ये घुसखोरी करत होते, अशी माहिती पंजशीरचे संरक्षण करणाऱ्या नाॅर्दर्न अलायन्सने दिलीय.
याबाबत दिलेली माहिती अशी, मंगळवारी रात्री तालिबानी हल्ला करत असताना नाॅर्दर्न अलायन्सने 350 पेक्षा अधिक तालिबानी दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं असून 40 पेक्षा अधिक दहशतवाद्यांना कैद केलंय, अशी माहिती नाॅर्दर्न अलायन्सने दिली.
नाॅर्दर्न अलायन्स कारवाई करत असताना त्यांच्या हाती अमेरिकेचे काही वाहनासह आणि शस्त्र सापडले आहेत. मंगळवारी रात्री तालिबान्यांनी पंजशीरमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता. पण, त्यांना नाॅर्दर्न अलायन्सने उत्तर देत त्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरवलं आहे.
पंजशीरचे स्थानिक पत्रकार नातिक मालिकजादा यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, पंजशीर प्रदेशामध्ये प्रवेश करताना गोलबहाक प्रांत आहे. त्या गोलबहाक प्रातांत ही तालिबानी आणि नाॅर्दर्न अलायन्स यांच्यामध्ये चकमक झाली. या भागातील एक पूल तालिबान्यांनी जमीनदोस्त केलाय.
So far from battle of Khavak last night, taliban has 350 casualties, more than 40 captured & prisoned. NRF got many new American vehicles, weapons & ammunitions as a trophy. Commanded Defense of Khavak,Commander Munib Amiri 👏🏼#AhmadMassoud #Taliban #Panjshir #secondresistance pic.twitter.com/nSlFN47xL2
— Parsi|Anjoman°³ (@MaganAryava) September 1, 2021