TOD Marathi

टिओडी मराठी, नागपूर, 1 सप्टेंबर 2021 – वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड नागपूर येथे सुमारे 1281 जागांसाठी मेगाभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी केली आहे. पदवीधर/तंत्रज्ञ अप्रेंटिस, ट्रेड अप्रेंटिस या पदांसाठी ही भरती होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 21 सप्टेंबर 2021 असणार आहे.

भरतीची पदे –

  • पदवीधर/तंत्रज्ञ अप्रेंटिस (Graduate/Technician Apprentices)
  • ट्रेड अप्रेंटिस (Trade Apprentices)

आवश्यक पात्रता आणि अनुभव –

  • पदवीधर/तंत्रज्ञ अप्रेंटिस (Graduate/Technician Apprentices) – पूर्णवेळ मायनिंग इंजिनिअरिंगची पदवी आवश्यक आहे.
  • ट्रेड अप्रेंटिस (Trade Apprentices) – संबंधित पदांनुसार ITI पर्यंत शिक्षण आवश्यक आहे.

अर्ज करण्याची शेवटची दिनांक – 21 सप्टेंबर 2021

या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी http://www.westerncoal.in/ या लिंकवर क्लिक करावे.