टिओडी मराठी, काबूल, दि. 17 ऑगस्ट 2021 – सध्या तालिबानने अफगाणिस्तानवर सत्ता काबीज केली आहे. या अफगाणिस्तान देशात त्यांनी दहशत निर्माण केली आहे, त्यामुळे देश गेल्याने अफगाणी लोकांना त्यांच्या भविष्याची चिंता वाटू लागली आहे. त्यामुळे अफगाणिस्तान सोडण्यासाठी पलायन करत आहेत. त्यासाठी काबुल एअरपोर्टवर लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. येथेही तालिबानी दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. आता अमेरिकेच्या सैन्यांनी हे काबुल एअरपोर्टवर कब्जा केला आहे. तसेच या तालिबानी दहशतवाद्यांना हल्ला केला तर याद राखा, असा इशाराही दिला आहे.
दोन दशकाच्या युद्धानंतर अमेरिकेने त्यांचे सैनिक पूर्णपणे परत बोलावलं आहे. अमेरिकेच्या या पाऊलानंतर दोन आठवड्यात तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केला आहे. १९९० पर्यंत अफगाणिस्तानवर तालिबानचा कब्जा होता. त्यानंतर आता पुन्हा अफगाणिस्तान तालिबानच्या हाती गेला आहे.
काबुल एअरपोर्टवरील जे फोटो समोर येताहेत, ते खूप भयावह आहेत. हे फोटो पाहिले तर काबुल एअरपोर्टवर काय चित्र आहे? हे स्पष्ट होत आहे. या फोटोतून अमेरिकन सैन्य हटले तर..भारतासह अन्य देशातील नागरिकांना याठिकाणाहून रेस्क्यू करणं कठीण होणार आहे.
म्हणून काबुल एअरपोर्टच्या सुरक्षेसाठी अमेरिकन सैन्याचे १ हजार अतिरिक्त जवान तैनात केले आहेत. तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यानंतर काबुल एअरपोर्टवर अराजकता माजली होती. ही परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्यासाठी अमेरिकेच्या सैन्यांनी दोन सशस्त्र लोकांना ठार केलं आहे.
तालिबानी सत्ता आल्यानंतर लोकांत खूप दहशत निर्माण झाली आहे कि, कुठल्याही स्थितीत देश सोडण्यासाठी लोकांनी काबुल एअरपोर्टवर गर्दी केली. एअरपोर्टवर हजारोंच्या संख्येने गर्दी झालीय.
विमानामध्ये चढण्यासाठी लोकांची चढाओढ झालेली सोशल मीडियातून आलेल्या व्हिडीओमधून समजत आहे. या गोंधळामध्ये अमेरिकन सैन्याने इशारा म्हणून गोळीबार केला आहे.
अमेरिकेने तालिबानला इशारा दिला की, जर त्यांनी अमेरिकन कर्मचाऱ्यांवर हल्ला केला आणि अफगाणिस्तानातील त्यांच्या कॅम्पना बाधित केलं तर अमेरिका त्याविरोधात कठोर आणि आक्रमक कारवाई करेल.
अमेरिकन सैन्याचे उच्च अधिकारी म्हणाले, आम्ही तालिबानी नेत्यांशी समोरासमोर चर्चा केलीय. एअरपोर्टहून लोकांना बाहेर जाण्याच्या कामात अडथळा आणू नका, असा आग्रह धरला आहे.
दोन दशक सुरू असलेल्या युद्धानंतर अमेरिकेने त्यांचे सैनिक पूर्णपणे परत बोलावले. अमेरिकेच्या या निर्णयानंतर दोन आठवड्यामध्ये तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केला आहे.
१९९६ ते २००१ दरम्यान तालिबानद्वारे लोकांवर केलेले अत्याचार आणि त्या कटू आठवणीच्या जखमा आजही लोकांच्या मनात कायम आहेत. तालिबानाच्या हिंसक कृत्यामुळे महिला चिंतेत असून तालिबानी काळात महिलांना घरात राहण्यास त्या मजबूर होत्या.