TOD Marathi

टिओडी मराठी, पुणे, दि. 17 ऑगस्ट 2021 – राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील आरोप-प्रत्यारोप गेल्या काही दिवसांपासून होत आहेत. राज्यपालांच्या वयोमानाचा उल्लेख राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली होता. त्यावर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्याला आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

यावेळी रुपाली चाकणकर म्हणाल्या, तुमचं जेवढं वय आहे, तेवढी शरद पवार यांची राजकीय कारकिर्द आहे. या संदर्भातील एक व्हिडीओ चाकणकर यांनी ट्विटरवर शेअर केलाय.

वयोमानामुळे राज्यपालांना लक्षात राहत नसावं, म्हणून सदस्यांच्या नियुक्त्या रखडल्या असतील, असे शरद पवारांनी म्हटलं होतं. त्यावर ‘राज्यपालांचं वय झालं आणि शरद पवारांचं वय झालं नाही का?’, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला होता.

या दरम्यान राज्यपाल हे भाजपचे पदाधिकारी नाहीत, त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी त्यांची बाजू घेण्याचा प्रश्न येत नाही. चंद्रकांतदादा तुमचं जितकं वय आहे, तेवढी साहेबांची संसदीय कारकीर्द आहे’, असा टोला चाकणकर यांनी लगावला.