टिओडी मराठी, मुंबई, दि. 17 ऑगस्ट 2021 – मनी लॉन्डरिंग प्रकरणी ईडीने महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना उद्या म्हणजे बुधवारी कार्यालयामध्ये हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. ईडीकडून होणारी अटक टाळण्यासाठी अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. हि याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे देशमुख यांच्या अडचणी वाढल्यात. आता अनिल देशमुख यांच्यावर ईडी कोणती कारवाई करणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये देशमुख यांच्याविरोधात ईडी कोणती कारवाई करणार आहे ? याकडे अनेकांचं लक्ष लागले आहे. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध कथित मनी लाँडरिंग प्रकरणामध्ये अटक करण्यापासून अंतरिम संरक्षण देण्यास नकार दिला होता .
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा एक अर्थ असाही होऊ शकतो की, देशमुख त्यांच्याविरोधात सुरु असलेल्या चौकशीच्या संदर्भामध्ये अटकेला सामोरे जाऊ शकतात.
ईडीसमोर जाणं टाळणाऱ्या देशमुख यांना आता चौकशीला हजर राहण्याशिवाय पर्याय शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे देशमुख यांना ईडी अटक करणार का? की शेवटचा प्रयत्न म्हणून देशमुख अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.